मास्क लावल्यावर गुदमरत असलेल्यांनी ‘ही’ बातमी नक्कीच वाचा; पहा काय म्हणतायेत संशोधक

करोना विषाणूची साथ जगभरात वेगाने आल्यावर सगळीकडे हात धुणे आणि मास्क वापरणे याचे महत्व पटले. आता आपण या काळजीसह करोनाशी दोन हात करीत आहोत. त्याचवेळी मास्क वापरल्याने गुदमरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर संशोधकांनी आपला अभ्यासपूर्ण असा अहवाल सादर केला आहे.

मास्क लावल्याने शरीरातील कार्बनडाय ऑक्साईड वायू बाहेर न पडता पुन्हा शरीरात जात असल्याने ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे धाप लागते असे अनेक मेसेजेस आणि चर्चा यातून फिरून लागले होते. या अफवा आहेत की वास्तव यावर संशोधकांनी अभ्यास केला आहे. त्यानुसारच अहवाल प्राप्त झालेला आहे.

त्या अहवालात म्हटले आहे की, मास्क वापरल्यामुळे दम लागल्यास जीवाला धोका अजिबात होत नाही. कोरोना विषाणूपासून बचावासाठी मास्कचा वापर करावाच लागणार आहे. अशावेळी आपण मोकळ्या आणि  सुरक्षित ठिकाणी एकटे असल्यास मास्क काही वेळासाठी काढून टाकण्यास अजिबात हरकत नाही. मग श्वास घ्यायला त्रास होणार नाही आणि हायसे वाटेल. मात्र, गर्दीच्या ठिकाणी मात्र लावायलाच हवा.

फुफ्फुसांशी संबंधित आजार आहेत त्या रुग्णांवरही मास्क लावल्याने फारच कमी प्रमाणात परिणाम होतो. वेगात चालताना किंवा एखादी टेकडी चढता तेव्हाही आपल्याला दम लागतो. तसेच मास्क लावण्याची सवय याआधी फ़क़्त वैद्यकिय क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांनाच होती. ते वळगता इतर कोणालाही नव्हती. अशावेळी करोनामुळे अचानक मास्कचा वापर वाढल्यामुळे अनेकांना गुदमरत आहे, श्वास घ्यायला त्रास होत आहे किंवा डोकं दुखत असल्याच्या तक्रारी आहेत.

अनल्स ऑफ द अमेरिकन थोरॅसिक सोसायटी या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे. अमेरिकेतील मियामी विद्यापीठातील शास्रज्ञांनी याबाबत संशोधन करून हा अहवाल दिला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता.क. : करोना विषाणूबाबत माहितीसाठी आरोग्य मंत्रालयाच्या +91-11-23978046 किंवा ncov2019@gmail.com & ncov2019@gov.in या विशेष हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here