तेंव्हाच मिळणार करोनाची लस; तोपर्यंत काळजी घेऊन वाट पाहण्याशिवाय नाही काहीच पर्याय..!

करोनाची या कंपनीची लस येणार आणि त्यांच्या ट्रायल या स्टेजला, त्यांच्या ट्रायल तेंव्हा पूर्ण होणार यासह सरकारने केले इतक्या लवकर लस आणण्याचे नियोजन.. अशा बातम्या ऐकून, वाचून कंटाळा आलेला असेलच. अशावेळी देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लस कधी येणार आणि पहिल्या टप्प्यात किती लोकांना मिळणार हेच सांगून टाकले आहे.

आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेले हे वेळापत्रक यशस्वी व्हावे अशीच सर्वांची इच्छा आहे. संडे संवाद कार्यक्रमाच्या चवथ्या पर्वात त्यांनी आपली ही भावना आणि केंद्र सरकारचे नियोजन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, भारत बायोटेक-आयसीएमआरची कोवॅक्सिन (Covaxin), जायडस कॅडिला जायकोव-डी आणि ऑक्सफोर्डची कोरोना वॅक्सिन या तीन लसच्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या ऑक्‍सफर्ड यूनिव्हर्सिटीने बनवलेल्या लसची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे. बाकीच्या दोन लसीची वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.

लस कधी आणि केंव्हा येणार व त्याचे वितरण कसे होणार याची माहिती देताना ते म्हणाले की, 2021 च्या जुलैपर्यंत 25 कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. सरकारला कोरोना लसीचे 400 ते 500 कोटी डोस प्राप्त होतील. ते टप्प्याटप्प्याने येतील तसे वितरीत करून लसीकरण केले जाईल. देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस कशी दिली जाईल. कोरोना लसीच्या संदर्भात एक उच्चस्तरीय तज्ञांनी कमिटी देखील कार्यरत आहे.

अशावेळी आपल्या सर्वांना एकमेकांची काळजी घेऊन आणि सरकारी यंत्रणेने दिलेली नियमावली पाळून व्यावहारिक संबंध जोपासावे लागतील. कारण, काळजी घेणे हाच यावरील खरा उपाय आहे.

संपादन : सचिन पाटील

ता.क. : करोना विषाणूबाबत माहितीसाठी आरोग्य मंत्रालयाच्या +91-11-23978046 किंवा ncov2019@gmail.com & ncov2019@gov.in या विशेष हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here