कृषी विधेयकामध्ये ‘त्या’ दोन ओळी टाकल्यास आम्ही भाजपात प्रवेश करु; ठाकरे सरकारमधील ‘त्या’ मंत्र्याचं मोठं विधान

मुंबई :

सध्या कृषी विधेयकावरून देशात विविध शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ‘खेती बचाव’ आंदोलन सुरु केले आहे. अशातच ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांनी मोठं विधान केलं आहे. ‘शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ व याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असं कृषी विधेयकांमध्ये नरेंद्र मोदींनी नमूद केल्यास आम्ही भाजपात प्रवेश करु’, असं विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे.

नव्याने मंजूर झालेले कृषी आणि कामगार कायदे महाराष्ट्रात लागू होणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आधीच स्पष्ट केलं होतं. अशातच बच्चू कडू यांनी कृषी कायद्यावरून मोदींना आव्हान दिले आहे.

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आम्ही हे बिल जसेच्या तसे स्वीकारायला तयार आहोत. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे नेहमी ५६ इंच छाती असल्याचे सांगतात, तसे नरेंद्र मोदींनी या विधेयकामध्ये केवळ त्या २ ओली टाकाव्यात.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here