अशी बनवा चविष्ट बाकरवडी; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

आता लॉक डाऊन संपत आला सगळं खाऊन झालं पण एक गोष्ट मात्र राहिली ती म्हणजे बाकरवडी… लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती कुरकुरीत आणि टेस्टी बाकरवडी…बाकरवडी कशी करायची हे अनेकांना माहिती नाही. आमच्या एका वाचकाने बाकरवडीची रेसिपी सांगा असे आग्रहाने सांगितले. म्हणूनच खास आमच्या खवय्या वाचकांसाठी आजची ही बाकरवडीची रेसिपी…

हे साहित्य घ्या आणि कुरकुरीत बाकरवडी बनवा…  
१) सारणासाठी – १ वाटी खोबरे किसलेले

२) अर्धी वाटी तीळ कूट

३) अर्धी वाटी शेंगदाणे कूट

४) १ चमचा खसखस

५) १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

६) १ वाटी चिरलेला हिरवा लसूण

७) १ चमचा हिरवी मिरची-लसूण ठेचा

८) १ चमचा तिखट

९) १ चमचा गरम मसाला

१०) १ चमचा धने-जिरेपूड

१०) अर्धा चमचा हळद

११) ३ चमचे पिठीसाखर

१२) १ चमचा लिंबूरसआणि चवीनुसार मीठ.

१३) कणीकसाठी – २ वाट्या बेसन, १ वाटी गव्हाचे पीठ. अर्धी वाटी मैदा, २ चमचे तेल, १ चमचा मीठ, अर्धा चमचा हळद.


अबब एवढे साहित्य… म्हणजे साहित्य थोडंच आहे दिसताना मोठ दिसतंय


कृती पहा आणि थेट खा

१) किसून भाजलेले खोबरे, तीळ, खसखस, साखर हे सर्व थोडे जाडसर दळून घ्यावे.

२) थोडी कोथिंबीर तेलाशिवाय कढईमध्ये परतून घ्यावी, म्हणजे त्यात पाण्याचे कण राहणार नाहीत.

३) मिरची व लसणाचा ठेचा, मिक्सरचे जिन्नस, तिखट, गरम मसाला, हळद, धने-जिरेपूड, मीठ, लिंबूरस सर्व एकत्र करून सारण तयार करावे.

४) आता कणकेची एक मोठी पोळी लाटून त्यावर चिंच-गुळाचे घट्ट मिश्रण लावावे. त्यावर सारण पसरवावे. घट्ट रोल वळावा.

५) १ इंच जाडीचे रोल कट करून हाताने थोडे दाबावे. नंतर मंद आचेवर तळून घ्यावे.
आता तुमची खमंग कुरकुरीत आणि टेस्टी बाकरवडी खाण्यास तयार…

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here