‘हे’ आहेत ज्वारी खाण्याचे आरोग्यदायी फायदे; वाचल्यावर ज्वारी खायला नाही म्हणणार नाहीतच

अनेक जणांना गव्हाच्या चपात्या खायची सवय लागली असते त्यामुळे ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खायला अनेक जण नकार देतात. त्यामुळे ज्वारीची मागणी कमी झाली आहे खरंतर अनेक जण सांगतात डाएटमध्ये ज्वारी असायला हवे परंतु डायट मध्येही ज्वारीचे समावेश केलेला असतो तसेच फास्ट फूड खायची सवय असल्यामुळे अनेक जण गव्हाच्या चपात्या खायला टाळाटाळ करतात. मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असतात. जाणून घ्‍या आरोग्यदायी ज्वारीचे फायदे :

१) ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास मोठ्या प्रमाणात आणि पटकन ऊर्जा मिळते.
२) रक्तदाब आणि हृदय संबंधित आजारांच्या समस्या जर आपणास असतील तर आपण ज्वारीचा आहारात समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्वारीमध्ये, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
३) ज्यांना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी.
४) ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते. 
५) सध्या जगभरातील तरुणांना लठ्ठपणाची समस्या जाणवते आहे. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा  कमी होण्यास मदत होते.
६) शरीरातील इन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास ज्वारी मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here