आपण अनेक प्रकारच्या चटणी रोजच्या आहारात घेत असतो पण आज आम्ही एक अनोखी मटार चटणी कशी बनवायची हे तुम्हाला सांगणार आहोत. एकदम चविष्ट अशी मटार चटणी बनवण्यासाठी हे साहित्य घ्या…
१) एक वाटी मटार
२) २ हिरव्या मिरच्या
३) अर्धा चमचा बडीशेप
४) १ छोटा तुकडा आले
५) कोथिंबीर
६) तेल
७) चवीनुसार मीठ
८) अर्धा चमचा जिरे
९) मोहरी
१०) कढीपत्ता
११) हळद
१२) पाण
ीआता हे साहित्य तर प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतेच. जर नसेल तर हे साहित्य उपलब्ध करा आणि अशी बनवा चविष्ट मटार चटणी… अगदी सोप्या पध्दतीने
१) प्रथम एका कढईमध्ये तेल घ्या.
२) त्यात मटार घालून ते ५ मिनिटे गॅसवर परतून घ्यावे.
३) मग त्यात मिरची, बडीशेप, आले, जिरे, कोथिंबीर, मीठ, अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
४) त्यावर फोडणी करून घालावी. झाली तुमची मटार चटणी तयार….
संपादन : संचिता कदम
- जगातील सर्वात महागडी गाय; जाणून घ्या तिच्या किमतीचे रहस्य
- सावधान… राज्यातील ‘या’ जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा फैलाव; करणार ‘एवढ्या’ कोंबड्या नष्ट
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव