‘त्या’ महिन्यात उघडणार नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा; बच्चू कडूंची माहिती

मुंबई :

कोरोनाचा प्रकोप वाढत असला तरीही आता जनजीवन पुन्हा रुळावर येत आहे. पर्याय नसल्याने लोकांनी पुन्हा पहिल्यासारखेच परंतु सुरक्षित पद्धतीने जगण्याचे ठरवले आहे. आता काही विद्यापीठांच्या परीक्षाही सुरु होणार आहेत. अशातच आता नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा सुरु केल्या जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

अधिक बोलताना कडू यांनी सांगितले की, दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे.

शाळा सुरु करायची म्हटल्यावर मोठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. शाळा आणि सुरक्षितता या विषयी अधिक माहिती सांगताना कडू यांनी स्पष्ट केले की, शाळा सुरु करताना शाळेमध्ये पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. पूर्ण शाळा निर्जंतुक करण्यात येईल आणि पूर्ण खबरदारी घेऊनच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here