हाथरस : आई व भावानेच केली तरुणीची हत्या; ‘त्या’ पक्षाच्या माजी आमदाराने उधळली मुक्ताफळे

मुंबई :

सध्या हाथरस प्रकरणावरून देशाच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर मोठी संतापाची लाट उसळलेली आहे. यावरून राजकारण केले जात असल्याचा आरोपही होत आहे. अनेक वादविवाद होत आहेत. अशातच हाथरस प्रकरणातील पिडीतेची तिच्या आई व भावानं हत्या केल्याचा दावा करत भाजप आमदाराने मुक्ताफळे उधळली आहेत.

भाजपची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्न उपस्थित होत असताना माजी आमदार राजवीर सिंह पहेलवान यांनी विचित्र दावा केल्यामुळे त्यांच्याविरोधातही समाजमाध्यमांमध्ये टीकेची झोड उठली आहे. ‘न्यूज १८’ वृत्तवाहिनीशी बोलताना राजवीर सिंह यांनी सांगितले की, मुलीची तिच्या आईने व भावानेच हत्या केली आहे. या प्रकरणात जातीवादावरून राजकारण केलं जात आहे.

यावेळी राजवीर सिंह यांनी ‘चारही युवक निर्दोष आहे. त्यांना फसवण्यात आलं आहे’, असाही दावा केला आहे.

हे प्रकरण मारहाणीचं आहे. जर चार मुलांवर गुन्हा दाखल झाला असता, तर त्यांची कोणतीही तक्रार नव्हती. पण, या सामूहिक बलात्काराच्या आरोपांबरोबरच युवकांना अटक केल्यानं लोकांमध्ये रागाची भावना असल्याचेही या माजी आमदाराने सांगितले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here