म्हणून शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढण्यास ‘त्या’ निवडणुकीत घातली बंदी; निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई :

सध्या देशभरात एक सामाजिक अस्थिरता उफाळून आलेली आहे. राजकीय पटलावरही अवस्थता निर्माण झालेली आहे. असं म्हटलं जातं की, राजकीय पटलावरील अस्वस्थता जेव्हा एक पातळी गाठते तेव्हा सत्तेत बदल होण्याची चिन्हे असतात. आता अशीच परिस्थिती असल्याचे मत तज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत. दरम्यान सध्या देशाच्या राजकारणाचा फोकस बिहार निवडणुकांकडे सरकला आहे. बिहार निवडणुकीत आता शिवसेनाही मोठ्या जागांसह उतरणार आहे. अशातच शिवसेनेला एक मोठा झटका बसला आहे.

 सध्या सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आक्षेप घेतला आहे. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे स्थानिक प्रसिद्ध किंवा ओळखीचे राजकीय पक्ष नाहीत. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होतो. आमची मते शिवसेनेला जात असल्याचा दावा जेडीयूने केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर ही विधानसभा निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे.

याविषयी बोलताना शिवसेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केले की, शिवसेना बिहार विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आम्ही अंदाजे अंदाजे 50 जागा लढवतो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आज आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यात आम्ही मागणी केली आहे की, फ्री सिम्बॉलपैकी एक चिन्ह आम्हाला देण्यात यावे. शिवसेनेचे सर्व उमेदवार त्या चिन्हावर निवडणूक लढतील.          

संपादन : विनोद्कुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here