मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करत भाजपने आणला शिवसेना आमदाराचा ‘तो’ व्हिडीओ समोर; वाचा अधिक

मुंबई :

सुशांत सिंग प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास दाखवल्यामुळे ती केस सीबीआयकडे गेली. अखेरीस बाहेर आलेल्या सत्यामुळे महाराष्ट्र पोलीस नाहक बदनाम झाल्याचे समोर आले. त्यामुळेसत्ताधारी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी पोलिसांची माफी मागा, असे सुनावले. याच पार्श्वभूमीवर भाजप मुंबईने अकोल्यातील शिवसेना आमदार गोपिकिशन बाजोरिया यांचा पोलिसांसोबत अरेरावी करतानाचा व्हिडीओ समोर आणला आहे.

भाजप मुंबईने सदर व्हिडीओ ट्वीट करत म्हटले आहे की, अकोल्यातील शिवसेना आमदार गोपिकिशन बाजोरिया. बघा पोलिसांशी यांची वागणूक अन् यांचे नेते पोलिस सन्मानाचा आव आणतात.

पुढे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दरवेळेस कोमट पाणी आणि मास्क याचे महत्त्व सांगतात पण त्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते त्यांचे ऐकत नाही हे सुद्धा स्पष्ट दिसतय’, असे म्हणत भाजपने ठाकरेंना टोलाही लगावला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here