प्रियांका गांधींचा ‘तो’ फोटो होतोय व्हायरल; वाचा, काय घडलाय प्रकार

दिल्ली :

हाथरस प्रकरणावरून कॉंग्रेस प्रचंड आक्रमक झाली. पोलिसांनी गाड्या ताब्यात घेतल्यावरही  हाथरसला पायी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधीना उत्तरप्रदेश पोलिसांकडून अडवण्यात आले. राहुल यांना धक्काबुक्की झाली तर प्रियांका यांच्यासोबतही गैरवर्तन करण्यात आले. एका पुरुष पोलिसाने प्रियांका यांना जखडले असल्याचा फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी तसेच सामान्य जनतेने विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कॉंग्रेस नेते नाना पटोले :- क्या यही न्यु इंडिया, शायनिंग इंडिया है? महिलाओ प्रती कितना आदर, सन्मान देश मे हो रहा है यह तस्वीर बया कर रही है।

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड :- ह्याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही.

प्रतिक पाटील :- हा माज सत्ता स्पॉन्सर आहे. पुरुष पोलीसवाल्याची एका स्त्रिच्या अंगाला हात लावायची हिम्मतच कशी होते

गजानन स्वामी :- बलात्कार करणाऱ्या आरोपींच समर्थन करणाऱ्या ढोंगी आदित्यनाथ सरकारच्या पोलिसांकडुन दुसरी काय अपेक्षा करणार..!

ऋषिकेश दळवी यांनी :- हे नक्की पोलिस च आहेत की दिल्ली दंगल मधले गुंड आहेत त्यांची चौकशी केली पाहिजे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here