दोन्ही समाजाच्या आरक्षणासंदर्भातील ‘त्या’ महत्वाच्या बैठकींना उदयनराजेंची दांडी; वाचा, काय आहे प्रकरण

मुंबई :

शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या पुढाकाराने नुकतीच पुण्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी मराठा विचार मंथन बैठक पार पडली. या बैठकीसाठी मेटे यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या दोघांनाही वैयक्तिक आमंत्रण दिले होते. मात्र दोघेही उपस्थित राहिले नाहीत. यानंतर मेटे यांनी खोचक टिपण्णी करत म्हटले की, उदयनराजेंना मी स्वत: आमंत्रण दिलं होतं. आज ते का आले नाहीत माहीती नाही. पण काही तातडीचं काम आलं किंवा आणलं गेलं माहिती नाही.

काल माजी मंत्री राम शिंदे हे धनगर आरक्षणासंदर्भात उदयनराजेंची भेट घेणार होते. तिथेही उदयनराजे गैरहजर होते. यातील विशेष बाब म्हणजे उदयनराजे अर्ध्या रस्त्यात आले होते मात्र अर्ध्या रस्त्यातूनच त्यांनी यु-टर्न घेतला असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली. यानंतर शिंदे यांनीही आपल्याच पक्षावर निशाणा साधत पक्षाला घरचा आहेर दिला. शिंदे म्हणाले की, विरोधात असलं प्रत्येकजण धनगर आरक्षण देऊ म्हणतो. पण सत्तेत आल्यानंतर त्यावर कुणी बोलायला तयार होत नाही. परिणामी आरक्षणाचा प्रश्न जिथे आहे तिथेच राहतो. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा खेळ केला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उदयनराजे अर्ध्या वाटेत होते. अर्ध्यातून त्यांनी यु-टर्न घेतला. उदयनराजे परत फिरण्याचे कारण समजले नसले तरी भेट रद्द झाल्यावर शिंदे यांनी मात्र पक्षावरच निशाणा साधला.        

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here