ब्रेकिंग : थेट सीबीआय चौकशीचे आदेश; हाथरसप्रकरणी पहा नेमके काय चाललेय ते

उत्तरप्रदेश येथील हाथरस घटनेतील पिडीतेला न्याय मिळण्याची शक्यता आहेच की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तिच्या कुटुंबीयांनी मागणी केलेली नसतानाही याप्रकरणाची थेट सीबीआय चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली आहे.

कुटुंबीयांनी यावर आक्षेप घेतला आहे. पिडीतेच्या भावाने म्हटले आहे की, आम्ही मागणी केली होती की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बहिण्याच्या अत्याचार आणि हत्याकांड प्रकरणाची चौकशी व्हावी. परंतु, सरकारने थेट यात सीबीआय आणली. एकूणच सीबीआयचा ‘वेगवान’ तपास आणि मुद्दे इकडचे तिकडे न करता थेट योग्य तपास करून ‘न्याय मिळवून देण्याची क्षमता’ यावर कुटुंबियांना अजिबात विश्वास दिसत नाही.

असे करण्यासह रात्रीतून पेट्रोल टाकून बहिणीला जळणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. निलंबन करून पुढे चौकशी होणार ई पुन्हा त्यात निर्दोष ठरून संबंधितांच्या नोकऱ्या शाबित राहण्याची भीती कुटुंबियांना आहे. यामुळे त्यांनी याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नसल्याच्या निषेधार्थ बहिणीच्या अस्थींचे विसर्जन  न करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या अस्थी बहिणीच्याच आहेत किंवा नाहीत यावरही कुटुंबियांना संशय आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here