म्हणून अस्थिविसर्जन करणार नाही; हाथरस पिडीतेच्या भावाने नेमके काय म्हटलेय पहा

हाथरस आणि इतर ठिकाणी झालेल्या महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी देश ढवळून निघाला आहे. अशावेळी काँग्रेसच्या नेत्यांवर लाठीचार्ज करण्याची किमया सत्ताधारी भाजपने केली आहे. त्यातच आता पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे अस्थिविसर्जन न करण्याचे म्हटले आहे.

जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांनी दिलेल्या धमक्या आणि प्रशासनाने या कुटुंबीयांवर केलेले अत्याचार आता जगजाहीर झालेले आहेत. त्यातच मोठा राजकीय दबाव असल्याने या कुटुंबियांना सरकारी यंत्रणा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जगणे मुश्कील केल्याच्याही बातम्या येत आहेत. त्यावर उत्तरप्रदेश सरकार आणि भाजपने वेळोवेळी असे काहीही घडले नसल्याचे म्हटले आहे.

अशावेळी आता पिडीतेच्या भावाने म्हटले आहे की, पोलिसांनी रात्रीत अंत्यसंस्कार केलेली मुलगी आमची बहिण होती किंवा नाही हेच समाजात नाही. त्यातच पोलिसांनी रात्रीतून अंत्यसंस्कार करताना बहिणीला थेट पेट्रोल टाकून जाळले आहे. अशावेळी योग्य आणि ठोस कारवाईची अपेक्षाच राहिलेली नाही. आम्ही मागणी केलेली नसतानाही सीबीआय चौकशी करण्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ सरकारने जाहीर केले आहे. त्यावरही या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली योग्य चौकशी करण्याचा आमचा मुद्दा सरकारने ऐकला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here