म्हणून ‘त्या’ दोन पिडीतांनी केली आत्महत्या; वाचा MP आणि बिहारमधील धक्कादायक घटना

उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस येथील तरुणीच्या अत्याचार व खुनाच्या प्रकरणाने अवघा देश हादरला आहे. त्याचवेळी आता या राज्याच्या शेजारी असलेल्या उत्तर भारतीय पट्ट्यातील बिहार आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये अशाच घटना घाडल्या आहेत.

मध्यप्रदेश राज्यामध्ये पोलिसांनी तक्रार न घेतल्याने वैतागलेल्या पिडीत दलित तरुणीने आत्महत्या करण्याचा अंतिम पर्याय स्वीकारला आहे. तर, बिहार राज्यातील पिडीतेने अत्याचार झाल्यावर एका खोलीत कोंडून घेत जनाच्या लाजेखातर आत्महत्या करण्याचा टोकाचा पर्याय स्वीकारला आहे. दोन्ही घटना खूप गंभीर आहेत.

बिहार राज्यातील गया जिल्ह्यात वाढदिवस साजरा करून घरी निघालेल्या तरुणीला तिच्याच गावात अत्याचाराची शिकार बनावे लागले आहे. त्यांनतर कशीबशी ही तरुणी आपल्या घरी पोहोचली. मात्र, मग नंतर तिने घरात कोंडून घेऊन आपले जीवन संपवले आहे. तिने फशी घेतली होती. उपचार मिळण्यापूर्वीच तिचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला.

तर, मध्यप्रदेश राज्यातील घटना आणखी दुदैवी आहे. पोलिसांनी अजिबात सहकार्य न केल्याने अगोदरच अत्याचार झालेल्या त्या तरुणीने मग फशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. नरसिंहपुर  येथील या घटनेत पिडीत दलित कुटुंबाची किमान ४ दिवस पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याचे नवभारत.कॉम या वेबसाईटच्या बातमीत म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here