‘त्या’ पद्धतीने मिनिटात खाली होऊ शकते तुमचे खाते; त्यासाठी काळजी घेण्याच्या ICICI बँकेने दिल्या ‘या’ टिप्स

सायबर माफिया सध्या नवीन शक्कल लढवून आपल्या बँक खात्यामधील किंवा क्रेडीट कार्डवरील पैसे चोरून नेत आहेत. त्यांनी आता मोबाइल सीमचे डूप्लीकेट अर्थात क्लोन करून पैसे पळवण्याचा नवा गोरखधंदा सुरू केला आहे.

sim swapping fraud असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. याद्वारे आपल्या मोबाइलच्या सीम कार्डाचे दुसरे आणि हुबेहूब असे क्लोन तयार करून त्यावरील कॉल आणि मेसेज तिकडे वळवून पैसे पळवले जातात. यासाठी नेमके काय करावे आणि आपल्या बँक खात्यातील पैसे कोणाकडे बाहेर परस्पर जाणार नाहीत याची काळजी अनेकांना आहे. त्यांच्यासाठी आयसीआयसीआय बँकेने काही सूचना केल्या आहेत.

बँकेने त्यांच्या ट्विटर खात्यावर याबाबत माहिती दिली आहे. अशा पद्धतीने आपले पैसे परस्पर चोरी होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठीच्या सूचना यात आहेत. बँकेने म्हटले आहे की, आपण आपल्याला बँक किंवा इतर ठिकाणाहून येणारे कॉल नियमितपणे येत आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवावे.

जर, आपल्याला जाणवले की बराच कालावधी झाला तरीही आपल्याला सरासरी वेळेनुसार फोन येत नाहीत किंवा मेसेज येत नाहीत. तर, समजून घ्यावे की आपले मोबाइल सीम कार्ड कोलन करण्यात आलेले आहे आणि त्याचा वापरही सुरू आहे. अशावेळी मग तातडीने आपल्या मोबाइल सर्विस प्रोव्हाईड करणाऱ्या कंपनीकडे याबाबत संपर्क साधावा.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here