ब्रेकिंग : कर्जदारांसाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय; पहा काय दिले जाणार बँकांना निर्देश

करोना विषाणूमुळे आलेल्या कोविड १९ साथीच्या आजाराने अवघे जग हैराण झालेले आहे. लॉकडाऊन केल्याने सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसलेला असल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अशावेळी कंपन्यांना मोठा झटका बसला आहे. परिणामी कर्जाचे हफ्ते थकले आहेत.

गृहकर्ज आणि लघु उद्योजकांनी घेतलेल्या कर्जाला त्यामुळेच काही बँकांनी थेट चक्रवाढ व्याज लावले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर सरकारची बाजू मांडताना मोदी सरकारने असे चक्रवाढ व्याज न घेण्याचे निर्देश दिले आहेत. सहा महिन्यांसाठी हा निर्णय लागू होणार आहे.

दि. १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत EMI न भरलेल्यांना याद्वारे मोठा दिलासा मिळणार आहे. २ कोटी रुपये यापर्यंतचे कर्ज असलेल्यांना याद्वारे अशी सूट मिळणार आहे. त्यामध्ये एमएसएमई (सूक्ष्म, लघु और मध्यम उद्योग), एजुकेशन, हाउसिंग, कंज्यूमर ड्यूरेबल, क्रेडिट कार्ड, ऑटो, पर्सनल लोन आणि वैयक्तिक कर्ज अशा सर्वांना याचा लाभ मिळणार आहे.

यासाठी गरीब कल्याण आणि आत्मनिर्भर भारत याच्या व्यतिरिक्त यासाठी पॅकेज देण्यात आल्याचे सरकारने म्हटलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here