पटना :
बिहार निवडणुका हा देशाच्या राजकीय पटलावर चर्चेचा विषय आहे. विविध पक्ष एकत्र येत असताना गुंता किचकट होत असतो परंतु बिहारमध्ये महाआघाडीचे समीकरण सहजरीत्या जुळून आले. आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांमधील जागावाटप ठरले असून आता हे सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
पटना येथे पत्रकार परिषदेत महाआघाडीच्या नेत्यांनी जागावाटप विषयी बोलताना सांगितले की, महाआघाडीमध्ये ठरलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आरजेडी १४४, काँग्रेस आणि डावे पक्ष २९ जागा लढवणार आहेत. तसेच महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (माले), सीपीआय, सीपीएम आणि व्हीआयपी या पक्षांचा समावेश आहे.
या पत्रकार परिषदेत युवा नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले की, आम्ही बिहारी आहोत. जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. माझा डीएनए शुद्ध आहे. पुढे बोलताना यादव यांनी नितीशकुमार यांच्या सरकारवर जळजळीत टीका केली. ते म्हणाले की, बिहारचे आजचे सरकार हे साठलेले अस्वच्छ पाणी आहे.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, २०१५च्या निवडणुकीत महाआघाडीला दणदणीत विजय मिळाला होता. मात्र नितीश कुमार यांनी काही काळानंतर महाआघाडीची साथ सोडत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान एनडीएच्या जागांचा तिढा अद्याप कायम आहे. एनडीएच्या घटकपक्षांची दिवसेदिंवस होणारी फुट आणि नाराजी यामुळे भाजपला जागावाटप करताना मोठी कसरत करावी लागणार, हे मात्र स्पष्ट आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव