‘या’ माजी मंत्र्यांचा पक्षाला घरचा आहेर; भाजपासह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा ‘खेळ’ केला

मुंबई :

सध्या राज्याच्या राजकीय पटलावर आरक्षणाच्या मुद्द्याने जोर धरला आहे. मराठा आणि धनगर आरक्षणासाठी विविध आंदोलने होत आहेत. अशातच माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी ‘काँग्रेस, भाजपासह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा ‘खेळ’ केला आहे’, असे म्हणत आपल्याच भाजप पक्षाला घरचा आहेर देत सुनावले.

अधिक बोलताना शिंदे यांनी सांगितले की, विरोधात असलं प्रत्येकजण धनगर आरक्षण देऊ म्हणतो. पण सत्तेत आल्यानंतर त्यावर कुणी बोलायला तयार होत नाही. परिणामी आरक्षणाचा प्रश्न जिथे आहे तिथेच राहतो. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा खेळ केला.

मिळालेल्या माहितीनुसार आज भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि शिंदे यांची भेट होणार होती. मात्र काही कारणांमुळे ही भेट होऊ शकली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उदयनराजे अर्ध्या वाटेत होते. अर्ध्यातून त्यांनी यु-टर्न घेतला. उदयनराजे परत फिरण्याचे कारण समजले नसले तरी भेट रद्द झाल्यावर शिंदे यांनी मात्र पक्षावरच निशाणा साधला.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here