धक्कादायक : दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, मुलीने केली आत्महत्या; ‘या’ राज्यात हाथरसची पुनरावृत्ती

गया :

सध्या स्रीयांवरील अत्याचारामुळे देश पेटून उठला आहे. हाथरस प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळलेली आहे. अशातच अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे सदर अल्पवयीन पिडीतीने आत्महत्या केली आहे. सदर घटना बिहारमधील गया येथे घडली आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सदर पिडीतेचे शवविच्छेदन झाल्यावर पोलिसांनी तिचे घाईघाईत अंतिमसंस्कार केले. हाथरस प्रकरणातही पोलिसांनी असाच अमानुष प्रकार केला होता. पोलीस प्रशासनावरील जनतेचा कमी होत असलेला विश्वास अशा घटनांमुळे अधिकच डळमळीत झाला आहे.

अशी घडली घटना :-

पिडीत अल्पवयीन मुलगी जवळच असलेल्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम संपल्यावर घरी परतत असताना गावातील काही मुलांनी तिला पहिले आणि एका मोकळ्या घरात नेले. तिथे या नराधम मुलांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. अखेरीस नाराधामांपासून कशीबशी सुटका करून घेत पिडीत मुलगी घरी पोहोचली. एका खोलीत स्वतःला बंद करून घेत तिने फाशी घेतली. मुलगी बाहेर येत नाही, हे लक्षात येताच घरच्यांनी दरवाजा तोडला. आहे त्या अवस्थेत तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. पिडीतेचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.

बिहार निवडणुका जवळ येत असल्यामुळे हे प्रकरण दाबले गेले, अशीही चर्चा लोकांमध्ये सुरु आहे. नेमकं पोलिसांनी असं पाऊल का उचललं, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here