प्रियांका गांधींचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; पहा, नेमका काय घडला प्रकार

मुंबई :

हाथरस प्रकरण आणि शेतकरीविरोधी कृषी कायद्यावरून कॉंग्रेस सध्या प्रचंड आक्रमक झाली आहे. काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी हे आपल्या कार्यकर्त्यांसह हाथरसला निघाले होते. सुरुवातीला त्यांची गडी अडविण्यात आले मग त्यांनी पायी प्रवास करण्याचे ठरविले तर उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींनाही धक्काबुक्की करण्यात आली. दरम्यान कॉंग्रेस कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी प्रियांका गांधी आपल्या कार्यकर्त्यांना लाठीचार्ज पासून वाचवत होत्या. त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

का होतोय हा व्हिडीओ व्हायरल :-

  • सहजासहजी राष्ट्रीय स्तरांवरील एखादा नेता आपल्या कार्यकर्त्यांसाठी लाठीचार्ज आपल्या अंगावर घेईल, अशी परिस्थिती सध्या राजकारणात नाही. अशातही एखाद्या महिला नेत्या थेट पोलिसांना आडव्या होतात आणि कार्यकर्त्यांवर जाणारी काठी आपल्याला लागू शकते, याची कल्पना असतानाही मध्ये पडतात.    
  • गेल्या ४-५ वर्षात कॉंग्रेस हा थंड पडलेला पक्ष झाला आहे. तसेच कॉंग्रेसमध्ये आक्रमक असे महिला नेतृत्वही दिसत नव्हते. मात्र प्रियांका गांधींच्या रूपाने कॉंग्रेसला सक्षम महिला नेतृत्व तर मिळालेच परंतु त्यांचा आक्रमक आणि आपल्या कार्यकर्त्यांशी निष्ठा जपण्याचा बाणाही दिसून आला.
  • संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here