मी ‘त्यांच्या’ दुःखात सहभागी आहे; रोहित पवारांची खोचक टिपण्णी

मुंबई :

प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक नव्या वादांना तोंड फुटले. अशातच त्या प्रकरणाला राजकीय वळण लागले त्यामुळे अनेक नवनवीन विषय, वाद, घटना माध्यमांनी समोर आणल्या. अखेरीस एम्सने दिलेल्या अहवालात सुशांत सिंगची हत्या झाली नसल्याचे समोर आले. याच पार्श्वभूमीवर ‘बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे’, असे म्हणत युवा आमदार रोहित पवारांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

पवार यांनी ट्वीट करत म्हटले की, आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी. रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करत सांगितले होते की, या प्रकरणाची सत्यता बाहेर येईलच. तोपर्यंत या विषयावर कुणीही राजकरण करू नये, असेही आवाहन त्यांनी केले होते.

पवार यांनी केलेल्या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. प्रतिक परदेशी यांनी म्हटले आहे की, आरोप करणाऱ्या सगळ्यांची तोंड काळी पडली आहे. काळ्या तोंडाने मागितलेली माफी स्वीकारली जाईल. तर दिनेश राठोड यांनी म्हटले आहे की, माफी मागितली पाहिजे…..पूर्ण बदनामी केली आपल्या महाराष्ट्रची. भाजपाने मराठी लोकांचा अपमान केलं आहे. यांना आता महाराष्ट्र मध्ये थारा नाही, अशाही प्रकारच्या प्रतिक्रिया या ट्वीट वर आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here