कच्चा कांदा खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे; नक्कीच वाचा

चविष्ट अन्न बनविण्यासाठी कांद्याचा वापर सर्रास केला जातो. तसेच कच्चा कांदा सुध्दा सर्रास जेवणात वापरला जातो. ज्याप्रकारे कांदा जेवणात जितका महत्त्वाचा आहे, तितकाच आरोग्यदायी देखील आहे. आता आपण जाणून घेऊया कच्चा कांदा खाण्याचे फायदे

1) उन्हाळ्यात नियमित कांदा खाल्ला तर डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.  

2) आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता कांदा भरून  काढतो.

3) कच्चा कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्यास पचन चांगल्या प्रकारे होते. 

4) कांदा नियमितपणे खाल्ल्यास सर्दी, कफ अथवा घशाच्या खवखवीचा त्रास कमी होतो. 

5) कांद्याच्या रसात गुळ अथवा मध एकत्र करुन पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. 

6) आहारामध्ये कांद्याचे सलाड  खाल्ल्याने डायबेटिसचा त्रास कमी होतो तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

7) रोज कांद्याचे सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर होऊन रक्त प्रवाहित राहते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here