अशी बनवा चविष्ट गाजराची चटणी; रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा

आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन, भन्नाट आणि चविष्ट पदार्थ घेऊन आलो आहोत. आपण सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारची चटणी खाल्ली असेल. पण गाजर चटणी नसेल खाल्ली… जरी खाल्ली असेल तरीपण ही थोड्या हटके पध्दतीने बनवलेली चटणी खाल्ली तर बोटे चाटत बसाल, इतकी चविष्ट आहे.

तर साहित्य घ्या मंडळींहो…

1) २ गाजर (मध्यम आकार)

२) ४ लसूण पाकळ्या

३) १ चमचा तिखट

४) १ चमचा लिंबू रस

५) फोडणीसाठी :- तेल, मोहरी, हिंग.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चवीपुरते मीठ

हे साहित्य घेतले असेल तर कृती पहा घ्या मंडळीहो…  

१) गाजर धुवून त्याचे साल काढा.

२) मग जाडसर किसून घ्या.

३) गाजराच्या किसमध्ये लसूण, तिखट, मीठ, लिंबाचा रस घालून मिक्सरला फिरवून घ्या.

४) चटणी फार कोरडी वाटत असेल २-३ चमचे पाणी घाला. (ऐच्छिक)

५) तयार झालेली चटणी एका भांड्यात काढून घ्या. त्याला वरून हिंग-मोहरीची चरचरीत फोडणी द्या.

५) यात शेंगदाण्याचा कूट घातला, तरी चटणीला छान चव येते. (ऐच्छिक) 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here