अशी बनवा हॉटेलसारखी तांबडी ग्रेव्ही; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

सध्या अनेक जण हॉटेलला मिस करत आहेत. हॉटेल मधील बटाटा तोच असतो जो आपल्याकडे असतो. पनिरही तेच असते जे आपल्याकडे असते मग असे काय वेगळे असते हॉटेल आणि आपल्या घरच्या भाज्यांमध्ये… ग्रेव्ही वेगळी असते. हॉटेलसारखी ग्रेव्ही आणि मग भाजी कुठलीही असो टेस्टीच लागणार. हॉटेलमध्ये जे तांबडी ग्रेव्ही असते तशीच ग्रेव्ही बनवा घरच्या घरी…

तांबडी ग्रेव्ही बनवण्यासाठी हे साहित्य घ्या मंडळी हो…

१) ५ चिरलेले टोमॅटो

२) ३ चिरलेले कांदे (बारीक चिरलेले)

३) १०-१२ काजू (अर्धा तास गरम पाण्यात भिजवलेले)

४) ८ लसूण पाकळ्या (चिरलेल्या)

५) १ इंच आले (चिरलेले)

६) २ चमचे तेल

७) १ चमचा गरम मसाला

८) १ चमचा धने-जिरे

९) अर्धा चमचा तिखट

१०) हळद (अंदाज घेऊन टाका पण अगदी कमी प्रमाणात)

हे साहित्य घेतले असेल तर घ्या की बनवायला…

१) टोमॅटो मिक्‍सर टाकून त्याची प्युरी करून घ्या.

२) काजूची पेस्ट करून घ्या.

३) चिरलेला कांदा, लसूण, आले हे सर्व गरम तेलात लाल रंग होईपर्यंत परतावे.

४) आता त्यात गरम मसाला, धने-जिरेपूड, आवडीप्रमाणे अर्धा चमचा (अथवा अधिक) तिखटपूड व थोडी हळद घालून सर्व मंद आचेवर परतून घ्यावे. 

५) मग त्यात टोमॅटो प्युरी घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतावे. 

६) आता त्यात काजू पेस्ट घालावी. गॅस बंद करून स्वादानुसार मीठ घालावे.

झाली आपली हॉटेलसारखी स्वादिष्ट तांबडी ग्रेव्ही तयार….

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here