हाथरस प्रकरणावरून कॉंग्रेस आक्रमक; वाराणसीत अडवली ‘त्या’ मंत्र्यांची गाडी, वाचा पुढे काय घडले

वाराणसी :

हाथरस प्रकरणावरून कॉंग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे. देशभरात कॉंग्रेसने निदर्शने केली आहेत. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधींनाही पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी रोखले गेले. तसेच त्यांनाही धक्काबुक्की केली. त्यामुळे कॉंग्रेसने अधिकच आक्रमक पवित्रा घेतला. वाराणसीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची गाडी अडवली गेली. त्यांना काळे झेंडे दाखवत गो-बैक च्या घोषणाही देण्यात आल्या.

दरम्यान राहुल गांधींनीही आक्रमक पवित्र घेत काही ट्वीट केले आहेत. राहूल यांनी ट्वीट करत सांगितले की, हाथरस प्रकरणातील दुखी: कुटुंबाला भेटून त्यांचे दुख वाटून घेण्यासाठी जगातील कोणतीच ताकद मला रोखू शकत नाही. एकूणच थंड असलेली कॉंग्रेस सध्या विरोधीपक्षाला साजेशी अशी भूमिका निभावताना दिसत आहे. देशभरात हाथरस प्रकरण आणि कृषी कायद्याविरोधात कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here