८४५८ कोटीच्या विमानातून प्रवास करणार ‘हा’ फकीर; कॉंग्रेसची जहरी टीका

मुंबई :

हा फकीर स्वतःची मौजमजा करण्यासाठी ८४५८ कोटीच्या विमानातून प्रवास करणार आहे, असे म्हणत कॉंग्रेस नेते व माजी आमदार भाई जगताप यांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता निशाणा साधला.

पुढे त्यांनी सांगितले की, बुडत्या अर्थव्यवस्थेला हवेत उडवण्यासाठी आपल्या फकिराचे ८४५८ कोटींचे भव्य विमान आले. देशातील कोरोनाग्रस्तांसाठी, देशातील कामगारांसाठी, देशातील त्रस्त झालेल्या जनतेसाठी फकिराकडे पैसे नाहीत पण हा फकीर स्वतःची मौजमजा करण्यासाठी ८४५८ कोटीच्या विमानातून प्रवास करणार आहे.

विविध मुद्द्यांवरून आक्रमक झालेल्या कॉंग्रेसने आता भाजपला लक्ष्य केले आहे. जगताप यांनीही थेट ८४५८ कोटींचे भव्य विमान वापरणारा ‘फकीर’ असे म्हणत मोदींवर खोचक टीका केली आहे. जगताप यांनी केलेल्या या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. निखील जाधव यांनी म्हटले आहे की, ८४५८ कोटीचा झोला आहे. ओ चायवाले… तेरा झोला बोहोत ‘महंगा’ पडा रे देश को.

रोहन जगदाळे यांनी म्हटले आहे की, हे म्हणजे घरी कितीहि दरिद्री असु दे, आम्ही मात्र मजा करनार… गांधींचा एक तरी गुण पाळा. विदेशी कपडे सोडा, विदेशी विमानं तरी वापरायला नाही पाहीजे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here