सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; दहावी-बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांनी ‘असा’ करा अर्ज

मुंबई :

सध्या कोरोनामुळे अनेक सरकारी तसेच खाजगी नियुक्त्या थांबलेल्या आहेत. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे. अशातच दहावी आणि बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी नोकरभरतीची संधी आणली आहे. ही भरती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित असणार आहे. भारतीय टपाल खात्याद्वारे होणाऱ्या या भरतीमुळे हजारो रिक्त असणारी पदे भरली जाणार आहेत. सोमवार ५ ऑक्टोबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार असून पोस्टमन, मल्टी टास्किंग स्टाफ आणि मेल गार्ड पदांसाठी ही भरती होत आहे.   

अशी आहेत पदे आणि त्यांची संख्या :-
पोस्टमन  – १,०२९ पदे
मेल गार्ड  – १५ पदे
मल्टी टास्किंग स्टाफ – ३२ पदे
मल्टी टास्किंग स्टाफ – २९५ पदे
एकूण पदे – १,३७१

असा करा अर्ज :-

ज्यांना सदर भरतीसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी खालील ठिकाणी क्लिक करून अर्ज भरा.

httos://doomah20.onlineaBplicationform.oro/MHPOST/

या आहेत बेसिक अटी :-

काही पदांसाठी १८ ते २५ वर्षे तर काही पदांसाठी १८ ते २७ वर्षे वयोमर्यादा आहे.  SC/ST/PWD प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत आहे.

शिक्षण किमान १०वी, १२वी असावे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here