ब्रेकिंग : कोरोनाचा आर्थिक जगताला मोठा फटका; जगात प्रसिद्ध असणारी ‘ती’ बांधकाम कंपनी दिवाळखोरीत

दुबई :

कोरोनाने आर्थिक जगताला मोठा फटका बसला आहे. सवर्सामान्य लोकांपासून तर मोठमोठ्या कंपन्या आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत. अशातच जगात प्रसिद्ध असणारे  ‘बुर्ज खलिफा’ या उंच आलिशान टॉवरची निर्मिती करणारी कंपनीने सुद्धा मान टाकली आहे. दुबईतून काम करणारी आणि जगभरात बांधकाम व्यवसायात प्रसिद्ध असणारी अरबटेक बिल्डर कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. 

स्थावर मालमत्ता क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करणारी आणि प्रसिद्ध असणाऱ्या या कंपनीलासुद्धा कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही एक कंपनी दिवाळखोरीत गेल्यावर दुबई आणि आखाती प्रदेशातील ४० हजार पेक्षा अधिक कर्मचारी बेरोजगार होऊ शकतात, असा अंदाज सांगितला जात आहे.

अरबटेक बिल्डर कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रात तसेच कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून अनेक क्षेत्रातील बड्या बड्या कंपन्यांना आर्थिक झटका बसला आहे. दरम्यान अरबटेकच्या संचालक मंडळ गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. दोन महिन्यांचा तोडगा निघाला नाही तर कंपनी दिवाळखोरीत जाऊ शकते. दिवाळखोरीची अंतिम सुनावणीपूर्वी तोडगा काढण्यासाठी अरबटेकच्या संचालक मंडळाकडे गुंतवणूकदारांशी चर्चा करण्यासाठी संधी आहे.

एवढा मोठा व्यवसाय असणाऱ्या कंपनीला मर्यादित कामे मिळत आहे. त्यामुळे आता किती दिवस तोट्यात व्यवसाय करायचा असा प्रश्न कंपनीपुढे आहे. अर्कोम कॅपिटलचे जॅप मजेर यांनी सांगितले की, दुबईत स्थावर मालमत्ता क्षेत्रावर मंदीचे सावट आहे. टाळेबंदीच्या काळात कंपनीला मर्यादित प्रमाणात नवी कंत्राटे मिळाली. त्यामुळे कंपनीपुढे इतका मोठा डोलारा सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अरबटेकने दिवाळखोरीत जाण्याची तयारी सुरु केली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here