‘त्यासाठी’ जगातील कोणतीच ताकद मला रोखू शकत नाही; राहुल गांधींचा यल्गार

दिल्ली :

हाथरस प्रकरण आणि कृषी विधेयकावरून कॉंग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे. हाथरस प्रकरणातील पिडीतेच्या कुटुंबाला भेटायला निघालेले कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधींना अडवण्यात आले तसेच पोलिसांकडून धक्काबुक्कीसुद्धा झाली. त्यामुळे आता राहुल गांधींसह कॉंग्रेसही अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. दरम्यान आज सकाळी राहूल गांधींनी ट्वीट करत सांगितले की, हाथरस प्रकरणातील दुखी: कुटुंबाला भेटून त्यांचे दुख वाटून घेण्यासाठी जगातील कोणतीच ताकद मला रोखू शकत नाही.

यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशसरकार वर निशाणा साधला. ते म्हणाले की, त्या मुलीसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत उत्तरप्रदेश सरकारने आणि तेथील पोलिसांनी केलेले वर्तन मला पटलेले नाही. ते मी स्वीकारणार नाही. ‘कुठल्याच हिंदुस्थानी नागरिकाने ते स्वीकारू नये’, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

एकूणच थंड असलेली कॉंग्रेस सध्या विरोधीपक्षाला साजेशी अशी भूमिका निभावताना दिसत आहे. देशभरात हाथरस प्रकरण आणि कृषी कायद्याविरोधात कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here