हाथरस व बलरामपूर येथील घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचा संताप, नगरमध्ये ‘त्या’ पक्षाचा रास्ता रोको

अहमदनगर :

उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा निषेधार्थ देशभर आंदोलनाचे रान पेटले आहे. नगरमध्येही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सांस्कृतिक दहशतवाद विरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आरपीआयच्या वतीने शहरातील निलक्रांती चौक येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी तोफखाना पोलीसांनी आंदोलकांना अटक केली. या आंदोलनात माजी नगरसेवक अजय साळवे, आरपीआयचे युवक शहर अध्यक्ष अमित काळे, विजय भांबळ, किरण दाभाडे, अशोक केदारे, दिपक गायकवाड, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, सनी खरारे, मंगेश मोकळ, संतोष सारसर, गौतम कांबळे, दया गजभिये, अविनाश भोसले आदींसह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक दहशतवाद विरोधी कृती समितीच्या वतीने वाडियापार्क क्रीडा संकुल येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. मोदी प्रणित भाजप सरकारच्या जातीयवादी धोरणामुळे देशातील दलित व अल्पसंख्यांक समुदायावर अत्याचार होत असल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली.मोदी व योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कॉ.सुभाष लांडे, बहिरनाथ वाकळे, कॉ.महेबुब सय्यद, अशोक सब्बन, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, अब्दुलरहीम शेख, अर्शद शेख, कॉ.अनंत लोखंडे, संध्या मेढे, भारती न्यालपेल्ली, आप्पासाहेब बंडेलू, तारीख शेख, कमर सुरुर, अंबादास दौंड, संदीप सकट, दत्ता वडवणे आदी उपस्थित होते. आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, आयटक, सीटू, कामगार संघटना महासंघ, लाल बावटा विडी कामगार संघटना, क्रांतीसिंह कामगार संघटना, भारतीय महिला फेडरेशन, जनवादी महिला संघटना, ए.आय.एस.एफ., ए.आय.वाय.एफ., डी.वाय.एफ.आय., अ.भा. जातीविरोधी मंच, अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ, रहेमत सुलतान फाऊंडेशन, पीस फाऊंडेशन, उर्जिता सोशल फाऊंडेशन, शब्दगंध, मागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्यांक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघाचा सहभाग होता.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here