अंबानी होणार आणखी मालामाल; पहा कोण करतेय १ अब्ज डॉलरची इन्व्हेस्टमेंट

सुप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला साथ देण्यासाठी जगभरातील अनेक दिग्गज कंपन्या सज्ज झालेल्या आहेत. भारतातील मोठी ग्राहकांची बाजारपेठ लक्षात घेऊन रिलायन्स रिटेल डिव्हिजनमध्ये अनेक कंपन्या आपली आर्थिक गंगाजळी ओतत आहेत.

अमेरिकेच्या GENERAL ATLANTIC यांनी 3,675 कोटी तर, अबू धाबी येथील मुबाडला इंवेस्टमेंट कंपनी यांनी 1.40 % इक्विटीसाठी आरआरवीएल कंपनीत 6247.5 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. अमेरिकन KKR यांनीही 1.75 % हिस्सेदारीसाठी 5550 कोटी रुपये गुंतवले आहेत. आता तर आणखी दोन कंपन्यांनी या डिव्हिजनमध्ये तब्बल १ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे.

सिंगापुर सॉवरेन वेल्थ फंड GIC आणि ग्लोबल इनवेस्टमेंट फर्म TPG Capital या दोन दिग्गज कंपन्या १ अब्ज डॉलर म्हणजे 7350 कोटी रुपये इतकी इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. जीआईसी 5512.5 कोटी, तर टीपीजी 1838.7 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार असल्याचे समजते.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here