तर मोदींच्या भाजपला मोठा झटका; पहा कोणता पक्ष देणार आहे धक्का..!

शिवसेना आणि अकाली दल यांनी मैत्री सोडून शत्रुत्व घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या भाजपला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकजनशक्ती हा पक्ष आपली वेगळी चूल मांडण्यासाठी तयार झाल्याची बातमी आली आहे.

भाजपला ऐन बिहारच्या निवडणुकीत हा मोठा झटका बसण्याची चिन्हे त्यामुळे निर्माण झाली आहे. लोक जनशक्ति पार्टी (एलजेपी) ही पार्टी आता बिहारमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी सज्ज झालेली आहे. वास्तवात एलजेपी पक्षाचे भाजपशी तसेही काहीच भांडण नाही. मात्र, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि हिन्दुस्तान अवाम मोर्चा (हम) यांच्याबाबतीत एलजेपीला अजिबात विश्वास उरलेला नाही.

मात्र, एखादा घटक पक्ष जर निवडणुकीत आपले उमेदवार देऊन तयारीत असेल तर घटक पक्ष असलेल्या भाजपलाही याचा मोठा झटका बसने साहजिक आहे. मात्र, त्यावर अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. नवभारत टाइम्स.कॉम यांना पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पार्टी अध्यक्ष चिराग पासवान यांनी आता यावर थेट बंडखोरीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ते अशी अधिकृत घोषणा करतील असेही चित्र आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here