पार्थ यांच्या भूमिकेवर शरद पवारांचे मोठे भाष्य; वाचा, काय म्हटले पवारांनी

मुंबई :

मराठा आरक्षणासाठी विवेक राहाडे नामक युवकाने आत्महत्या केली. त्यानंतर पार्थ अजित पवार यांनी या प्रकरणावरून आक्रमक होत सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचे संकेत दिले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार्थ यांच्या भुमिकेविषयी आपले मत स्पष्ट केले. ‘मराठा आरक्षणावर कुणीही व्यक्ती कोर्टात जाऊ शकते. पार्थच काय, जर दहा लोक या प्रकरणात कोर्टात गेले तर त्याचा राज्य सरकारलाच फायदा होईल. शेवटी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला जी स्थगिती देण्यात आली आहे ती उठवली जावी, हाच आमचाही उद्देश आहे आणि त्यासाठीच राज्य सरकारने विनंती अर्ज केला आहे’, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पार्थ यांनी घेतलेल्या या भूमिकेवर वडील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल पार्थ यांच्या भूमिकेविषयी आपले मत स्पष्ट केले होते. ‘हल्लीची पिढी ट्विटरवर स्वत:ची मतं व्यक्त करते. पार्थनंही त्याचं मत व्यक्त केलंय. त्याच्या प्रत्येक ट्वीटवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा महत्त्वाची इतर अनेक कामं माझ्याकडं आहेत. माझ्याकडं अनेक जबाबदाऱ्या आहेत’, असे स्पष्टपणे सांगत अजित पवारांनी आपली भूमिका मांडली.

तसेच ‘पार्थ यांची भूमिका ही पक्षाची नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संपादन : स्वप्नील पवार

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here