टेलेग्रामनेही आणली ती धासू फीचर्स; व्हाटस्अॅपला देणार दणक्यात टक्कर

पर्सनल मेसिजिंग सर्विस अॅप्लिकेशन म्हणजे व्हाटस्अॅप. असाच जगभरात ट्रेंड आहे. त्याला छेद देण्यासाठी आता टेलेग्राम या अॅप्लिकेशनने तयारी केली आहे. अनेक बदलांसह हे अॅप्लिकेशन नव्या रंग आणि ढंगात मोबाइल युझर्सना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले आहे.

होय, अनेक दमदार फिचर त्यांनी आणले आहे. सर्च फिल्टर, कमेंट्स, इमोजी आणि एडमिनसंबंधी काही खास फिचर आल्याने आता हे अनेकांना आणखी जास्त आकर्षित करणार आहे. मोठे ग्रुप बनवणे आणि माहिती देणारे चॅनेल तयार करण्याची सोय असलेल्या टेलेग्राम आताही वापरले जात आहे. नव्हे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

आता तर सर्च फिल्टर लावून यामध्ये आपण आता  चैट, मीडिया, लिंक, फाइल, म्यूजिक आणि व्हाईस मेसेज असे सहा घटक तातडीने शोधू शकतो.

चॅनेलमध्ये यापुढेही अॅडमिशनचेच नियम चालतील. मात्र, यापुढे त्यात इतर सदस्य कॉमेंट्स करू शकतील. त्यासाठी स्टीकर, GIF आणि व्हाईस मेसेज यांचा वापर कारणे शक्य असेल. डिस्कशन ग्रुप जर चॅनेलला जोडला तरच असे करता येणार आहे.

अॅडमिशनला जर गुप्त राहायचे असेल तर तशीही खास सोय यापुढे मिळणार आहे. त्यानुसार नेमका कोण अॅडमिशन आहे हे लपवणे यापुढे शक्य होणार आहे.

एनिमेशन पॉप-अप याचीही जोड देण्यात येणार आहे. मैसेज डिलीट, मीडिया सेव आणि नोटिफिकेशन सेव्ह करताना अनेकदा याची मदत होणार आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे आता चॅटिंग करताना आपले प्रोफाईल पिक्चर सर्वांना दिसणार आहे. तसेच ते पाहण्यासाठी एकाच क्लिकवर सोय करण्यात आलेली आहे.

अशा पद्धतीने या दोन दिग्गज कंपन्या आता एकमेकांना भिडणार आहेत. व्यवसायाच्या आणि ग्राहकांच्या वाधीसाठीचे त्यांच्यातील हे युद्ध आता अनेक नव्या सेवा आणि फिचर घेऊन येणार हे निश्चित आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here