‘ही’ कंपनी देणार १५ हजार नोकऱ्या; फेस्टीव्हलमध्ये वृद्धीसाठी केली तयारी

भारतातील अग्रणी पुरवठा साखळी सेवा प्रदाता असलेली डिलिव्हरी ही कंपनी येत्या सणासुदीच्या काळासाठी सज्ज होत आहे. फेस्टिव्हल सिजनमध्ये ६५ ते ७५ दशलक्ष पॅकेज पोहोचवण्यासाठी सज्ज होताना १५,००० हंगामी नियुक्त्या करण्याचे उद्दिष्ट त्यांचे आहे.

यामध्ये सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर्स, पिकअप, हब, सर्व्हिस सेंटर अशा पदावर नियुक्त्या केल्या जातील. सोबतच विविध भागीदारी कार्यक्रम जसे की ऑन-बोर्डिंग वैयक्तिक दुचाकीस्वार, ट्रान्सपोर्टर्स, स्थानिक किराणा आणि व्यावसायिकांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत माल पोहोचवण्याचे हे नियोजन आहे. त्यासाठी कंपनी क्षमता वाढवत आहे. यंदा भारतभरात २५ हजारांपेक्षा जास्त पार्टनर याद्वारे साइन-अप्स करण्याची कंपनीची योजना आहे.

सध्याच्या बेसपेक्षा दुप्पट क्षमता करण्याचे हे प्रयत्न आहेत. भारतात १२,००० पेक्षा जास्त व्यवसाय आणि व्यक्तींनी आधीच डिलिव्हरीशी भागीदारी केलेली आहे. व्यवस्थापकीय संचालक व मुख्य व्यवसाय अधिकारी संदीप बारसिया यांनी माहिती देताना सांगितले की, जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा तयार करण्यासाठचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बिलासपूर, भिवंडी व बंगलोर या शहरात मेगा ट्रकिंग टर्मिनल सुरू करण्यात येतील. पुढील १८ ते २४ महिन्यांमध्ये विस्तारण्यासाठी ३०० कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक करून व्यवसाय वृद्धीचे नियोजन आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here