बाबरीप्रकरणी पाकिस्तानचाही हात असल्याचा अँगल तपासायला सीबीआय विसरली..!

अयोध्येतील बाबरी मशीद नेमकी कोणी आणि कशी पडली याबाबतची चर्चा अनेक दशकांपासून आहे. त्याप्रकरणी निकाल देताना विशेष सीबीआय न्यायाधीशांनी बुधवारी या खटल्यातील भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह इतर सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. त्याचवेळी बाबरीप्रकरणी पाकिस्तानचाही अँगल तपासायला सीबीआय यंत्रणा विसरली असल्याचे निकालात म्हटले आहे.

 2300 पानांच्या निकालपत्रात म्हटले आहे की, या 32 आरोपींविरोधातील सीबीआयने दाखल केलेले आरोपपत्र हे निरर्थक ठरते. कारण या यंत्रणेने दि. 5 डिसेंबर 1992 रोजी स्थानिक गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीकडे लक्षच दिलेले नाही. दि. 6 डिसेंबरला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील काही मंडळी स्थानिक लोकांत मिसळून वादग्रस्त वास्तूला हानी पोहोचवू शकतात असे त्यात म्हटले होते. मात्र, या अहवालाचा तपास सीबीआय यंत्रणेने केला नाही.

दि. 2 डिसेंबर 1992 रोजी ‘कार सेवा’मध्ये अडथळा आणण्यासाठी तसेच धार्मिक तेढ वाढवण्याच्या उद्देशाने मुस्लीम समाजातील काही व्यक्तींकडून ‘मजार’चीही तोडफोड करण्यात आली होती. त्याला आगही लावण्यात आली. त्यावर लक्ष दिले नाही याचीही नोंद विशेष न्यायालयाने घेतली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here