अभिमानास्पद…! अहमदनगर येथे चाचणी झालेले क्षेपणास्त्र देशाच्या संरक्षण दलात

अहमदनगर :

अहमदनगरजवळील के. के. रेंज येथे लष्काराचा युद्ध सराव चालतो. याच युद्ध सराव मैदानावर गुरुवारी एका क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली असून, हे क्षेपणास्त्र लांब पल्यावरील किंवा लपलेल्या आणि स्थळ बदललेल्या क्षत्रूचा अचूक निषाणा साधणार आहे. हे क्षेपणास्त्र देशाच्या संरक्षणात दाखल झाल्यामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढली आहे. भारतीय संरक्षण दल तीन विभागात विभागलेले आहे. पहिले आहे लष्कर (भूदल), दुसरे हवाई दल आणि तिसरे नौदल. के. के. रेंज येथे झालेले क्षेपणास्त्र जमिनीवरील शत्रूला नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या रणगाड्यांवरुन हे क्षेपणास्त्र लेझर किरणांच्या सहायाने क्षत्रूचा अचूक वेध घेणार आहे.

गुरुवारी लेझरच्या मदतीने शत्रूचा अचूक भेद करणाऱ्या रणगाडाभेदी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. ही चाचणी के. के. रेंज येथील लष्काराचा युद्ध सराव क्षेत्रावर करण्यात आली. अर्जुन रणगाड्यावर हे क्षेपणास्त्र बसवून लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात जवान यशस्वी झाले. या क्षेपणास्त्राची निर्मिती डीआरडीओच्या पुण्यातील एआरडीई आणि एचईएमआरएल या प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली. एआरडीईमध्ये क्षेपणास्त्राची रचना, त्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान तसेच क्षेपणास्त्र डागण्यासाठी आवश्यक असलेली लॉचिंग यंत्रणा निर्माण करण्यात आली तर एचईएमआरएल प्रयोगशाळेत क्षेपणास्त्रात आवश्यक असणारा दारूगोळा तसेच विविध तांत्रिक गोष्टींची निर्मिती करण्यात आली आहे.

लांब पल्ल्यावरील शत्रूचा अचूक वेध घेण्यासाठी या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्राद्वारे लपून बसलेला शत्रूचा रणगाडा भेदण्याची यशस्वी चाचणी लष्करातर्फे करण्यात आली.लेझर गायडेड रणगाडाभेदी क्षेपणास्त्र हे रणगाडा युद्धात अत्यंत उपयुक्त आहे. रणगाडा युद्धात वेगाने आणि अचूक कारवाई करण्यासाठी हे क्षेपणास्त्र वापतात. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय रणगाडे अधिक क्षक्तीशाली झाले आहेत. शत्रुच्या रणगाड्याचा लेझरच्या मदतीने वेध घेऊन त्याला नष्ट करण्यासाठी ही क्षेपणास्त्र वापरली जाणार आहेत. यात शत्रुच्या रणगाड्याने जागा बदलली तरी लेझरच्या मदतीने त्यांना शोधून काढून त्याला उद्धवस्त करणे शक्य होणार आहे. याच्या मदतीने ५ किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेता येणार आहे. अर्जुन रणगड्याच्या १२० एमएम तोफेतून हे क्षेपणास्त्र डागता येणार आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here