असे करा ब्रॉयलरचे खाद्य व्यवस्थापन; पोल्ट्री फार्मिगमध्ये तूस वापरण्यात ‘ही’ काळजी घ्या

कोंबड्यांच्या वाढीसाठी त्यांना पोषक आहार गरजेचा असतो. अशावेळी त्यांना पिल्लांच्या अवस्थेत आणि मोठे झाल्यावरही खाद्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक आहे. खाद्य चांगले साठवणे आणि वेळेत देणे असे दोन्ही घटक यामध्ये येतेत. त्यासाठी शेडमध्ये काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याच मुद्द्यांची आज आपण माहिती पाहणार आहोत.

खाद्य व्यवस्थापनाचे मुद्दे असे :

 1. शेडमध्ये वेगळ्या खोलीत खाद्याच्या पोत्यांची व औषधांची साठवण करावी.
 2. खाद्याची गुणवत्ता खराब होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
 3. त्यासाठी भिंतीपासून १ फुट लांब आणि जमिनीच्या वर १ फुट उंचीवर लाकडी फळ्यांची माचुळी करून त्यावर पाच-पाच त्या लॉटमध्ये पोते ठेवावेत.
 4. खाद्य ज्या ठिकाणी ठेवले आहे ती जागा कोरडी असावी. तसेच जास्त प्रमाणात खाद्य एकत्र ठेवल्यास उष्णता वाढून खाद्याची प्रतवारी खराब होते. त्यामुळे लॉटचा नियम पाळावा.
 5. खाद्य ठेवलेल्या भागात उंदीर होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण, उंदीर झाल्यास मग ते खाद्याची नासाडी करतात.
 6. खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी ५० पिल्लांसाठी एक फिडर असेल असे नियोजन करावे. फिडरजवळ पिल्लांची गर्दी न होण्याची काळजी घ्यावी.
 7. खाद्याची भांडी प्रत्येक आठवड्याला स्वच्छ आणि साफ करून घ्यावीत.
 8. खाद्य खालील तुसामध्ये पडणार नाही याचीही काळजी घ्यावी. असे सांडलेले खाद्य आणि त्यासह जर तूस पक्षांनी खाल्ल्यास त्यामुळे आजार वाढतात.
 9. खाद्यासह पाणी देण्यासाठीही पिल्ले व मोठ्या कोंबड्या यांच्यासाठी प्रत्येकी ५० साठी (पिल्ले/कोंबड्या) एक ड्रिंकर व एक फिडर  असावे. ऑटो ड्रिंकरसाठीही हेच प्रमाण ठेवावे.
 10. खाद्य हा पिल्ले व कोंबड्या यांच्या वाढीसाठी खूप महत्वाचा घटक आहे. त्यामुळे या मुद्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

खाद्याचे व्यवस्थापन कसे करावे हे आपण पाहिले. आता आपण तूस व लिटर व्यवस्थापन याची माहिती पाहणार आहोत. शेडमधील पाणी व आर्द्रता शोषून घेण्यासाठी आणि पिलांच्या पायांना इजा होऊ नये याची काळजी घेण्यासाठी तूस (किंवा धान्याची टरफले) पसरले जाते. असे तूस वापरता पुढील घटकांची काळजी घ्यावी. कारण काळजी न घेतल्यास यामुळे पिल्ले व कोंबड्यांना काही आजार होऊन वजनाची योग्य प्रमाणात वाढ न होण्यासह अखेरीस मरही वाढू शकते. ज्यामुळे नफा घटतो.

लक्षात घेण्याचे मुद्दे असे :

 1. आपण खाली पसरण्यासाठी आणलेली टरफले किंवा तूस धूळ असलेली अजिबात असू नये. कारण धूळयुक्त तुसामुळे पक्षांना श्वसनदाह होऊ शकतो.
 2. प्रति १००० चौरस फुट क्षेत्रफळाच्या शेडमध्ये ४०० किलो तूस वापरावे.
 3. उन्हाळ्यात तुसाचा थर हिवाळ्याच्या तुलनेत कमी असावा. हिवाळ्यात चार इंच, तर उन्हाळ्यात दोन इंचाचा थर टाकावा.
 4. तुसामधील आर्द्रता २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यास पिलांना जीवाणू व विषाणूजन्य आजारांची लागण होऊ शकते. अशावेळी मग तूस तातडीने बदलावे.
 5. तुसामध्ये अमोनिया या वायूचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पक्षी आजारी पडून वजनवाढ रोखली जाते. हे टाळण्यासाठी १००० चौरस फुटांवर गरजेनुसार १०-२० किलो सुपर फॉस्फेट फवारावे.

अशा पद्धतीने खाद्य आणि तुसाचे व्यवस्थापन करावे. यासाठी गरजेनुसार अनुभवी व्यक्ती किंवा तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे.

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

(क्रमशः)

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here