‘ते’ मंदीर उघडा; शिवसेना खासदारानेच केली मागणी

अहमदनगर :

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यापासून तर रोहित पवारांपर्यंत अनेकांनी मंदिर उघडावे याची मागणी केली आहे. परंतु दिवसेदिंवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ते शक्य नाही. अशातच आता थेट शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीचे साईबाबा मंदिर उघडावे, अशी मागणी केली आहे.

‘करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, ही दक्षता घेण्यासाठी सरकारने मंदिर बंद केले होते. मंदिर बंद करण्याचा तसा काही विषय नव्हता. तेथे केवळ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढू नयेत, म्हणून ती बंद केली होती. आता टप्प्याटप्याने मंदिरे सुद्धा सुरू होतील, असेही लोखंडेंनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शिर्डी साईबाबा मंदिराविषयी बोलताना सांगितले की, ‘सरकारच्या नियमाला पूर्ण बांधिल राहून शिर्डी साईबाबा मंदिर खुले करावे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याबाबत कुठेलेही आदेश दिलेले नाहीत. तरीही शिवसेना खासदार लोखंडे यांनी ही मागणी केली आहे. अधिक माहिती सांगताना ते म्हणाले की, शिर्डीचे मंदिर चालू झाले पाहिजे. परंतु त्याठिकाणी श्री साई बाबांचे जे भक्त येणार आहेत, त्यांना ट्रेन, गाड्या व विमाने उपलब्ध नसतील, तर त्यांचे शिर्डीत येण्याचे प्रमाण कमी होईल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here