जयंती विशेष : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ही कविता नक्कीच वाचा

गांधी बाबा तू ग्रेट आहेस,

कारण तू द्वेषाने, कपटाने वागण्याऱ्यावर देखील प्रेम करायला शिकवतो.

गांधी बाबा तू ग्रेट आहेस,

कारण तू संकटसमयी शांत डोक्याने विचार करायला लावतोस.

गांधी बाबा तू ग्रेट आहेस,

कारण कृपमंडुक वृत्तीच्या लोकांना देखील माफ करायला शिकवतो.

गांधी बाबा तू ग्रेट आहेस,

कारण योग्य वेळेची वाट पाहायला शिकवतो.

गांधी बाबा तू ग्रेट आहेस,

कारण तू माणसं जोडायला शिकवतो ना की तोडायला.

गांधी बाबा तू ग्रेट आहेस,

कारण तू माणूस म्हणून जगायला शिकवतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here