महाराष्ट्रात घडलेत ‘एवढे’ हाथरस; वाचा, राज्यातील धक्कादायक आकडेवारी

मुंबई :

सध्या हाथरस प्रकरणावरून देशाच्या राजकीय पटलावर रणकंदन पेटलेले आहे. बलात्कार झाल्यावर दलित मुलीचा मृत्यूही झाला. मृताचे अंत्यसंस्कारसुद्धा तिच्या घरच्यांना करू दिले नाहीत. या प्रकरणावरून देशाच्या राजकारणात नवीन वादही सुरु झाले आहेत. अशातच महाराष्ट्रात एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात आजवर ४७ खुनाच्या आणि बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक बलात्कार आणि खुनाची प्रकरणं आपल्या महाराष्ट्रातच घडलेली आहेत.

इंडियन एक्स्प्रेस आणि राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी झालेले लैंगिक अत्याचार मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक झाले आहेत. बाल लैंगिक अत्याचारातही महाराष्ट्र पुढे आहे. स्त्रियांविरोधातल्या अत्याचारातही मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

काय आहे हाथरस प्रकरण :

19 वर्षीय दलित मुलीवर बलात्कार केला गेला. नंतर तिच्यावर शारीरिक हिंसाही केली गेली. अखेरीस तिला दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरु असतानाच पीडितेची मृत्यू झाला. या घटनेमुळे अखंड भारतात संतापाची लाट उसळलेली आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here