धक्कादायक : कोरोनापेक्षा भयंकर ‘ब्युबॉनिक प्लेग’चा झाला उद्रेक; ‘या’ लक्षणांकडेही करू नका दुर्लक्ष

मुंबई :

कोरोना या संसर्गजन्य रोगाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोना नंतर संसर्गजन्य रोग पसरण्याची एक सौम्य लाट जगभरात आलेली आहे. कोरोनानंतर किमान ३-४ संसर्गजन्य रोग पसरले त्यांचे प्रमाण कमी असले तरी बरेच लोक त्यामुळे बाधित झाले. अशातच आता उत्तर चीनमध्ये कोरोनापेक्षा भयंकर ‘ब्युबॉनिक प्लेग’चा उद्रेक झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल २२ लोकांना हा रोग झाला असून त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘ब्युबॉनिक प्लेग’ने बाधित झालेले सर्व मंगोलियामधील रहिवासी आहेत.    

नेमका काय आहे हा ‘ब्युबॉनिक प्लेग’?

१४ व्या शतकात कोट्यावधी लोकांचा या या रोगामुळे मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेले लोक चीन, भारत, सीरिया आणि इजिप्तमधील होते. युरोपमधून आलेल्या १२ जहाजात असलेल्या कामगारांना या विषाणूची बाधा झाली आणि तिथून तो पसरला.

कशामुळे पसरतो :-

प्राण्यांच्या शरीरावर असणाऱ्या पिसवांमुळे हा विषाणू पसरतो. या प्राण्याच्या संपर्कात माणसे आली की त्यांनाही बाधा होते.

लक्षणे :-

ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी ही या आजाराची लक्षणं आहेत. त्याचबरोबर मानेवर, काखेत किंवा जांघेत गाठीदेखील येतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here