का होतोय हाथरसच्या खासदाराचा फोटो व्हायरल; नेमकं काय आहे प्रकरण, वाचा थोडक्यात

हाथरस :

उत्तरप्रदेशमधील हाथरस प्रकरण सध्या देशाच्या राजकीय पटलावर चर्चेत आहे. दलित मुलीचा बलात्कार केला गेला. नंतर तिच्या कुटुंबियांची परवानगी न घेता तिचे अंत्यसंस्कार पोलीस प्रशासनाने उरकवून घेतले. या सगळ्या घटनेविरुद्ध लोकांमध्ये संतापाची प्रचंड मोठी लाट आहे. आता या प्रकरणावरून हाथरसचे खासदार राजवीर दिलेर यांचा फोटो व्हायरल होत आहे.

खासदार दिलेर हे दलित समाजातील असून ते वर्ण-जाती-धर्म व्यवस्थेतील सर्व नियम पाळतात. वरिष्ठ जातीच्या लोकांसमोर ते नेहमी खालीच बसतात. कुठेही बाहेर पाणी प्यायचे असल्यास ते स्वतःसोबत डिस्पोजेबल ग्लास ठेवतात. व्हायरल होणाऱ्या फोटोतही ते खाली बसून डिस्पोजेबल ग्लासमध्ये चहा पीत आहेत तर त्यांच्याशेजारी खुर्चीत बसलेला युवक कपातून चहा पीत आहे.

अशी व्यवस्था असल्यावर आणि लोकप्रतिनिधी असा अडाणी असल्यावर तिथे न्याय कसा मिळणार, असा सवाल लोक करत आहेत. या खासदाराचा समाजमाध्यमांवर निषेध केला जात आहे.  

याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते व माजी आमदार भाई जगताप यांनी ‘कंगणाची भिंत पडल्यावर नंगा नाच करणारी गोदी मीडिया हाथरस घटनेवर गप्प का’?, असा सवाल केला आहे. योगीच्या राजीनाम्याची मागणी का नाही?, असाही सवल जगताप यांनी ट्वीट करत विचारला आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here