ब्रेकिंग : ‘त्या’ मुलीवर अत्याचार नाही; ‘त्यामुळे’ झाला तिचा मृत्यू, ADG यांनी केला दावा

उत्तरप्रदेश येथील हाथरस घटनेतील अत्याचारित मुलीच्या घटनेने अवघा देश हादरला आहे. त्यात तिचा मृत्यू आणि पोलिसांनी कुटुंबियांना बाजूला ठेऊन रात्रीत केलेले तिचे अंत्यसंस्कार यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. अशावेळी पोलीस प्रशासनातील ADG लॉ & ऑर्डर यांनी त्या मुलीचा मृत्यू गळ्याला मार लागल्याने झाल्याचे म्हटले आहे.

ADG प्रशांत कुमार यांनी याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, संबंधित मुलीवर अजिबात बलात्कार झालेला नाही. तिच्या गळ्याला मार लागून त्यात ती जखमी झाली होती. पोस्टमार्टेम अहवालातूनही ही बाब स्पष्ट झालेली आहे.

समाजात जातीय तणाव निर्माण करण्यासाठी अशा अफवा पसरविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकूणच याप्रकरणी देशभरात राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालेले असतानाच पोलिसांनी ही नवी माहिती दिली आहे.

मूळ बातमीसाठी पहा :

https://navbharattimes.indiatimes.com/state/uttar-pradesh/aligarh/hathras-incident-forensic-report-makes-clear-woman-was-not-raped-says-adg-prashant-kumar/articleshow/78427040.cms

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here