ब्रेकिंग : सत्यजित तांबेंनी केले ‘हे’ आवाहन; आज ६ वाजता कॉंग्रेस करणार असे आंदोलन

उत्तरप्रदेश राज्यातील घटनेच्या निषेधार्थ आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीमुळे महाराष्ट्र काँग्रेस संतप्त झाली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा राजीनामा मागतानाच आंदोलनाची हाक दिली आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आज सायं ६ वा. युवक कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देशाचे नेते राहुलजी गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपापल्या भागात धरणे आंदोलन करावे,असे मी आवाहन करतो. उत्तरप्रदेश सरकारची मनमानी ह्या देशातील लोकशाहीला व मानवतेला काळिमा फासणारी आहे, तिचा निषेध करुया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here