ब्रेकिंग : म्हणून मंत्री बाळासाहेब थोरातांनी केली आंदोलनाची घोषणा

उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनाही मारहाण करण्यात आलेली आहे. त्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. त्यावर महाराष्ट्र कॉंग्रेस पार्टीने निषेधाचा सूर मोठा करीत आंदोलनाची हाक दिली आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, हाथरस पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जाणा-या राहुलजी व प्रियंकाजींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. या दडपशाहीच्या विरोधात कॉंग्रेस राज्यभर आंदोलन करणार असून मी स्वत: थोड्याच वेळात मंत्रालयाजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here