आमदार पाटील यांनी आठवण करून दिली ‘त्या’ मुद्द्याची; पहा काय म्हटलेय त्यांनी राहुल गांधींच्या घटनेबाबत

उत्तरप्रदेश राज्यातील हाथसर येथील घटनेमध्ये अत्याचारित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यास कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना मज्जाव करण्यात आलेला आहे. पोलिसांनी राहुल यांच्यासह प्रियांका गांधी आणि कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आहे. त्यावर धुळे येथील आमदार कुणाल पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

त्यांनी ट्विटरवर ब्रिटीश राजवटीच्या दडपशाहीचा मुद्दा याला जोडून भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या देशातून जुलमी हुकूमशाहीला हद्दपार करण्यासाठीच काँग्रेस चा जन्म झाला होता, या ध्येयासाठी लढण्याची काँग्रेसची उज्वल परंपरा आजही कायम आहे. आज राहूल गांधीजी यांना धक्काबुक्की करून जुलमी हुकुमशाही ने स्वतःचा पाया खिळखिळा केला. हुकुमशाहीचा हा डोलारा आता लवकरच कोसळून जमीनदोस्त होणार.

त्यावर दीपक मोरे यांनी म्हटले आहे की, भाजपा सरकार नाही हितर तालिबान मधली सरकार असल्या सारखी हुकूमशाही करत आहे अत्यंत भयानक परिस्थिती केली आहे भातात मोदी सरकार ने आता फक्त स्वास घेताना मोदी सरकार ची परवानगी घेईची बाकी राहिले.

संपादन : सचिन पाटील  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here