राहुल गांधींना धक्काबुक्की; देशभरातून संतापाची लाट, पहा काय म्हणतायेत नेटकरी

उत्तरप्रदेश म्हणजे गुंडाराज असेच चित्र आहे. याच चित्राला फाडण्याचे कर्तव्य पार पडण्याऐवजी येथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार आणि पोलीस प्रशासन त्याला रंग भरण्यात मश्गुल आहेत. हम करे सो कायदा, असेच सत्ताधारी भाजपला वाटत आहे. त्यावरून आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या मुद्यावर देशभरातून संताप व्यक्त होत आहे.

पुण्यातील पत्रकार चिंतामण पत्की यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश पोलिसांचे आभार ! प्रियांका आणि राहुल यांनी पॉलिटिकल आणि मीडिया स्पेस भरून काढली. मात्र त्यासाठी हाथरससारखी दुर्दैवी घटना घडावी लागू नये. या बहीण-भावाने केवळ प्रतिक्रियावादी राजकारण न करता रोज पूर्णवेळ राजकारण केले तर बदल अशक्य नाही. बहीण-भावाला अडवून, त्यांच्याशी धक्काबुक्की करून, ताब्यात घेऊन उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल यांना हवा दिली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकली आहे. काँग्रेसच्या लोकांनी या पोलिसांबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे.

अक्षय तांबे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे चालवल्या जाणाऱ्या एका पेजवर म्हटले आहे की, तुम्ही त्याला त्याची कॉलर पकडून खाली पाडलं, पण लक्षात असू द्या तुम्ही बंदुकीने जर जरी छाताडावर गोळ्या घातल्या असत्या तरी तो मागे नसता हटला, कारण रक्तातच त्यांच्या भारत देशासाठी बलिदान देण्याचा इतिहास आहे ….!!

आदिनाथ चिंताकुटे यांनी म्हटले आहे की, #uppolice लक्षात असू द्या तुम्ही बंदुकीने जर जरी छाताडावर गोळ्या घातल्या असत्या तरी ते मागे नसते हटले, कारण रक्तातच त्यांच्या भारत देशासाठी बलिदान देण्याचा इतिहास आहे ….!!

वैभव मानकर यांनी एक कविता शेअर करून संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला

काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला

रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई

अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई

गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here