कृषी सुधारणेवर झुनझुनवाला यांनी व्यक्त केले मत; ‘त्या’ शेअरमध्ये मोठी वाढ होण्याची त्यांना अपेक्षा

राकेश झुनझुनवाला म्हणजे भारतीय शेअर बाजारातील हुकमी एक्का ताब्यात असलेले व्यक्तिमत्व.  त्यांनी शेअर बाजारात कमावलेली मोठी रक्कम अनेकांचे डोळे विस्फारणारी आहे. त्याच झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी सुधारणा विधेयकांमुळे बाजारात मोठे सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

त्यांनी टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबतीत आपले मत मांडले आहे. तसेच भारतीय बाजारामध्ये मोठी मंदी येण्याच्या बातम्यावर लक्ष ठेऊन असलेल्यांना डोळे विस्फारणारे सकारात्मक बदल पाहायला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

झुनझुनवाला यांनी म्हटले आहे की, बाजारातील दिग्गज कंपन्यांचे शेअर पडलेले असले तरी त्या कंपन्या मजबूत आहेत. त्यामुळे त्यांचे भाव वाढतील. फार्मा सेक्टरमध्ये मोठी संधी दिसत आहे. तसेच टाटा या ग्रुपच्या शेअरलाही आणखी चांगले दिवस येतील.

गरज पडेल तेंव्हा आणि संधी दिसेल तेंव्हा टाटा ग्रुप आणि अंबानी कुटुंब यांच्याकडून बाजारात आणखी खूप मोठी गुंतवणूक होईल. लॉकडाऊन आता उघडत आहे. अशावेळी बाजारात आणखी सुधारणा होऊन देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असेही त्यांनी म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here